भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य प्रतिष्ठान क्षेत्र महिवरी । गोदेचियें तिरीं पुण्यभूमि

dhanya pratishthan kshetra mahivari | godechiyen tirin punyabhumi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
धन्य प्रतिष्ठान क्षेत्र महिवरी । गोदेचियें तिरीं पुण्यभूमि ॥१॥ धन्य तो श्रीगुरु जनार्दन सखा । त्रैलोक्य देखा पावन केलें ॥२॥ धन्य तो अवधूत प्रसादें तारीलें । कृतकृत्य केले सुफळ जन्म ॥३॥ निळा म्हणे त्याचा न कळेचि पार । कोण बडीवार माझा तेथें ॥४॥