भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य महाराज पुंडलीक मुनी। वैकुंठीचा सखा आणिला भूतळालागोनी

dhanya maharaj pundalik muni| vaikunthicha sakha anila bhutalalagoni

रचनाकार: संत सेना · अभंग
धन्य महाराज पुंडलीक मुनी। वैकुंठीचा सखा आणिला भूतळालागोनी ॥१॥ केला उपकार जग तारिलें सकळ । निरसली भ्रांति माउली स्नेहाळ ॥२॥ आली चंद्रभागा गर्जना करीत । तुझिया भेटीलागी उतावीळ धांवत ॥ ३॥ जोडोनिया पाणी सेना करी विनवणी। म्हणे धन्य पुंडलीका माथा ठेविला चरणीं ॥४॥