भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य पुंडलिक भक्त निवडला । अक्षयीं राहिला चंद्रभागीं

dhanya pundalik bhakta nivadala | akshayin rahila chandrabhagin

रचनाकार: संत नरहरी · अभंग
धन्य पुंडलिक भक्त निवडला । अक्षयीं राहिला चंद्रभागीं ॥ १ ॥ भक्त नामदेव अक्षयीं जडला । पायरी तो झाला महाद्वारीं ॥ २ ॥ ज्ञानोबा सोपान निघती हे भक्त । अक्षयीं राहत परब्रह्मीं ॥ ३ ॥ बोधरज भला वचनीं गोविला । कीर्तनीं राहिला पांडुरंग ॥ ४ ॥ साधुसंत फार येती थोर थोर । उभा निरंतर चोखामेळा ॥ ५ ॥ संत साधुजन वंदिती चरण । नरहरी निशिदिन सेवेलागी ॥ ६ ॥