भजनी मालिका

भजने

असे नांदतु हा हरी सर्वजीवीं । असे व्यापुनी अग्नी हा काष्ठ तेवीं । घटीं बिंबलें बिंब हें ठायिठायीं । तया संगती नासु हा त्यासि नाहीं ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

असों चरणावरी तुमच्या ठेऊनियां मन । करुनियां कीर्तन रुपीं तुमचियां दृष्टी ॥१॥ होईल ते हो कैसी आमुची गती । नणों योगयुक्ति तप साधन दुसरें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

असो थोरथोरांची मात । तूंचि मिळालासी गोपाळांत ।।१।। त्यांच्या शिदोऱ्या सोडिसी ग्रासोग्रास उच्छिष्ट खासी ॥ २॥

रचनाकार: संत जनाबाई

असोत लोकांचे बोल शिरावरी । माझी मज बरी विठाबाई ॥१॥ आपंगिलें मज आहे ते कृपाळु । बहुत कनवाळु अंतरींची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

असोत हे तुझे प्रकार सकळ । काय खळखळ करावी हे ॥१॥ आमुचें स्वहित जाणतसों आम्ही । तुझें वर्म नामीं आहे तुझ्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम