भजनी मालिका

भजने

अशोकाच्या वनीं सीता शोक करी । कां हों अंतरले रघुनाथ दुरी । येउनि गुंफेमाजी दुष्टें केली चोरी । कांहो मज आणिले अवघड लंकापुरी ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

अश्व पाहतां तो सोज्ज्वळा । म्हणती निळा शुभ्रासी ॥१॥ तैसें नांवापासीं काये । करणी आहे विचित्र ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अश्वरुपिया केसासूर । ठाणमाण अति सुंदर । जैसा उच्चैश्रवा रहंवर । देवलोकीं इंद्राचा ॥१॥ शोभिवंत तयाहुनी आगळा । असुई अवलोकितां डोळा । पाहावाचि ऐसा वेळोवेळां । आठवों नेदी आणि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अष्टदिशी व्यापक नारायण । तेथें नाहीं पूर्व पश्चिमेंचें भान ॥१॥ पहा कर्माची राहाटी । सर्व व्यापक संकल्प म्हणती उठाउठी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अष्टधातुवेगळा देखिला पुतळा । जिवींचा जिव्हाळा श्रीविठ्ठल ॥१॥ तयाचे चरणीं माझा दंडवत । घडो आणि चित्त जडो नामीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अष्टहि दिग्गज आणि दिकपाळ । थावरिले कुळाचळ निज सत्ता ॥१॥ तो हा परमात्मा श्रीहरी । येऊनि इटेवरीं ठाकला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अष्टही दिशा पुर्ण भरला देव । मा पुर्व पश्चिम भाव तेथें कैंचा ॥१॥ पाहे तिकदे देव व्यापुनी भरला । रिता ठाव ठरला कोठें नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अष्टही प्रहर करिसी संसाराचा धंदा । कां रे त्या गोविंदा स्मरसी ना ॥१॥ अंतकांळी कोण सोडवील तूंतें । कां रे स्वहितातें विसरलासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अष्टांग योग साधिती साधनी । तो हारिकीर्तनीं नाचे बापा ॥१॥ यज्ञादिकीं अवदान नेघें वो माये । तो उभा राहुनी क्षीरापती खाये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अष्टांग साधन धूम्रपाण अटी । ब्रह्माज्ञानासाठीं करिताती ॥१॥ परि तें न लभे न लभे सर्वथा । वाउग्याची कथा बोलताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अष्टांग साधन न करी वाउगें । धूम्रपान वेगें कासया करिसी ॥१॥ मनीं हरि धरीं मनीं हरि धरीं । वाउगा तुं फेरीं पडों नको ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अष्टांग साधनें करिताती योगी । परी मन अव्यंगीं होत नाहीं ॥१॥ जिंकितांचि मन साधनें साधती । न जिंकितां फजिती मागें पुढें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अष्टादश पुराणें सांगती बडिवार । नाम सारांचें सार कलियुगीं ॥१॥ तारिले पातकी विश्र्वास घातकी । मुक्त झाले लोकीं तिहीं सत्य ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अष्टोत्तरशें तीर्थें सारीं । ओघें आलीं आळंकापुरीं । वाद्यें वाजताती गजरीं । कीर्तन लहरी अमृताची ॥१॥

रचनाकार: संत नामदेव