भजनी मालिका
← भजनांकडे परत

असें येथींचिया दिनें । भाग्यहीन सकळां

asen yethinchiya dinen | bhagyahin sakalan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
असें येथींचिया दिनें । भाग्यहीन सकळां ॥१॥ भांडवल एवढें गांठी । नाम कंठीं धरियेलें ॥ध्रु.॥ आणिक तें दुजें कांहीं । मज नाहीं यावरी ॥२॥ तुका म्हणे केली कोणें । एवढा नेणें लौकिक ॥३॥