भजनी मालिका
← भजनांकडे परत

असोत लोकांचे बोल शिरावरी । माझी मज बरी विठाबाई

asot lokanche bol shiravari | majhi maj bari vithabai

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
असोत लोकांचे बोल शिरावरी । माझी मज बरी विठाबाई ॥१॥ आपंगिलें मज आहे ते कृपाळु । बहुत कनवाळु अंतरींची ॥ध्रु.॥ वेदशास्त्रें जिसी वर्णिती पुराणें । तिचें मी पोसणें लडिवाळ ॥२॥ जिचें नाम कामधेनु कल्पतरू । तिचें मी लेंकरूं तुका म्हणे ॥३॥