भजनी मालिका
← भजनांकडे परत

असो आतां कांहीं करोनियां ग्लांती

aso atan kanhin karoniyan glanti

असो आतां कांहीं करोनियां ग्लांती । कोणा काकुलती येईल येथें ॥१॥ करुं कांहीं दिस राहे तो सायास । झोंबों त्या लागास भावाचिये ॥२॥ करितां रुदना बापुडें म्हणती । परि नये अंतीं कामा कोणी ॥३॥ तुकायबंधु म्हणे पडिलिया वनीं । विचार तो मनीं बोलिला हे ॥४॥