भजनी मालिका
← भजनांकडे परत

असोत हे बोल । अवघें तूं चि भांडवल

asot he bol | avaghen tun chi bhandaval

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
असोत हे बोल । अवघें तूं चि भांडवल ॥१॥ माझा मायबाप देवा । सज्जन सोयरा केशवा ॥ध्रु.॥ गाळियेले भेद । सारियेले वादावाद ॥२॥ तुका म्हणे मधीं । आतां न पडे उपाधि॥३॥