भजनी मालिका

भजने

दुर्बळा वाणीच्या एक दोनि सिद्धी । सदैवा समाधि विश्वरूपीं ॥१॥ काय त्याचें वांयां गेलें तें एक । सदा प्रेमसुख सर्वकाळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दुर्बळांची कन्या समर्थाचे केलीं । अवदसा निमाली दरिद्राची ॥१॥ हरिकृपा होतां भक्ता निघती दोंदें । नाचती स्वानंदें हरिरंगी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुर्बळाचें कोण । ऐके घालूनियां मन । राहिलें कारण। तयावांचूनि काय तें ॥१॥ कळों आलें अनुभवें । पांडुरंगा माझ्या जीवें । न संगतां ठावें । पडे चर्या देखोनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दुर्बळाचे हातीं सांपडलें धन । करितां जतन नये त्यासी ॥१॥ तैसी परी मज झाली नारायणा । योगक्षेम जाणां तुम्ही आतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दुर्लभ नरदेह झाला तुह्मां आह्मां । येणें साधूं प्रेमा राघोबाचा ॥१॥ अवघे हातोहातीं तरों भवसिंधु । आवडी गोविंदु गाऊं गीतीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दुर्लभ होतें तें सुलभ पैं झालें । आपण नटलें सगुण रूप ॥१॥ धरोनी आवडी पंढरीये आलें । उभेंचि राहिलें कर कटीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

दुष्ट आचरण ग्वाही माझें मन । मज ठावे गुण दोष माझे ॥१॥ आतां तुम्ही सर्वजाण पांडुरंगा । पाहिजे प्रसंगाऐसें केलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा । संग न करावा पापि-याचा ॥१॥ सर्पाचें पिलें सानें ह्मणऊनि पोशिलें । त्यासी पान दिधलें अमृताचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दुष्ट भूषण सज्जनाचें । अलभ्यलाभ पुण्य त्याचें ॥१॥ धन्य ऐसा परउपकारी । जाय नरका आणिकांवारि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दुष्टाचें चिंतन भिन्ने अंतरीं । जरी जन्मवरी उपदेशिला । पालथे घागरी घातलें जीवन । न धरी च जाण तें ही त्याला ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

दुसरी जे होती गर्भिण कुरंगी । तेही लागवेगीं आली तेथें ॥१॥ आहा ऐसें काय केलें वो साजणी । नयेसी अझुनी कोंपटासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव