भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्लभ होतें तें सुलभ पैं झालें । आपण नटलें सगुण रूप

durlabh hoten ten sulabh pain jhalen | apan natalen sagun rup

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
दुर्लभ होतें तें सुलभ पैं झालें । आपण नटलें सगुण रूप ॥१॥ धरोनी आवडी पंढरीये आलें । उभेंचि राहिलें कर कटीं ॥२॥ युगें अपरंपार न कळे ज्याचा पार । वैष्णवांचा भार शोभतसे ॥३॥ दिंडया गरूड टके पताका शोभती । बागडे नाचती हरिदास ॥४॥ चोखा म्हणे ऐसें धरोनियां भीड । उभ उभी कोड पुरवितो ॥५॥