भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्बळा वाणीच्या एक दोनि सिद्धी । सदैवा समाधि विश्वरूपीं

durbala vanichya ek doni siddhi | sadaiva samadhi vishvarupin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुर्बळा वाणीच्या एक दोनि सिद्धी । सदैवा समाधि विश्वरूपीं ॥१॥ काय त्याचें वांयां गेलें तें एक । सदा प्रेमसुख सर्वकाळ ॥ध्रु.॥ तीर्थ देव दुरी तया भाग्यहीना । विश्व त्या सज्जना दुमदुमिलें ॥२॥ तुका म्हणे एक वाहाती मोळिया । भाग्यें आगिळया घरा येती ॥३॥