भजनी मालिका

भजने

दुजेपणें नको पाहुं सर्वाठायीं । एकरुप देहीं दिसे ॥१॥ येणें सर्व काम सुगम सोपारें । दुजेपंणे वावरे देहबुद्धी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुजेंपणें पाहे तरी देवाचे चरण । आणि तें कीर्तन वैष्णवांचें ॥१॥ कीर्तनीं नाचती हरिदास प्रेमें । दुजेपणा नेमें हारुनी जाय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुडीवरी दुडी गौळणी सातें निघाली । गौळणी गोरस म्हणों विसरली ॥१॥ गोविंदु घ्या कोनी दामोदरु घ्या गे । तंव तंव हांसती मथुरेच्या गे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुध आणिलें परगृहींहूनी । संतोष नाही माझे मनीं । श्रीहरी देईल मज लागुनी । तरीच दुध घेईन ॥१॥ पिता म्हणतां हे वचन । बाळा तूं अज्ञान । कां वर्जिलें अन्नपान । क्षुधा बहुत पीडितसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुध दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥१॥ हें चि वर्म आम्हां भाविकांचे हातीं । म्हणऊनि चित्तीं धरिला राम ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग ॥१॥ तैसे खळां मुखें न करावें श्रवण । अहंकारें मन विटाळलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥१॥ कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची ती कळा काय जाणे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दुबळ्यांसी धन । सांपडलिया नोहे जतन । अभाविकांसी नाम जाण । तैशा रीतीं ॥१॥ धनलोभीयाचे परी । जैसें चित्त धनावरी । तैसें हृदया माझारीं । नाम जप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुबार बाहुली वस्तुरूप झाली । पाहतां सोहं मेळी चिदांनंद ॥१॥ अधमात्रा स्थान नयनींच प्रमाण । मसुरेसमान हा वर्ण जेथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दुरवरी वोझें वाहिलासे भार । आतां वेरझार खुंटलीसे ॥१॥ माझिया पैं मनें मानिला विश्वास । दृढभावें आस धरियेली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ