भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्बळाचें कोण । ऐके घालूनियां मन । राहिलें कारण। तयावांचूनि काय तें

durbalachen kon | aike ghaluniyan man | rahilen karan| tayavanchuni kay ten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुर्बळाचें कोण । ऐके घालूनियां मन । राहिलें कारण। तयावांचूनि काय तें ॥१॥ कळों आलें अनुभवें । पांडुरंगा माझ्या जीवें । न संगतां ठावें । पडे चर्या देखोनि ॥ध्रु.॥ काम क्रोध माझ्या देहीं । भेदाभेद गेले नाहीं । होतें तेथें कांहीं । तुज कृपा करितां॥२॥ हें तों नव्हे उचित । नुपेक्षावें शरणागत । तुका म्हणे रीत । तुमची आम्हां न कळे ॥३॥