भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुष्टाचें चिंतन भिन्ने अंतरीं । जरी जन्मवरी उपदेशिला

dushtachen chintan bhinne antarin | jari janmavari upadeshila

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुष्टाचें चिंतन भिन्ने अंतरीं । जरी जन्मवरी उपदेशिला । पालथे घागरी घातलें जीवन । न धरी च जाण तें ही त्याला ॥१॥ जन्मा येउनि तेणें पतन चि साधिलें । तमोगुणें व्यापिलें जया नरा । जळो जळो हें त्याचें ज्यालेपण । कासया हे आलें संवसारा ॥ध्रु.॥ पाषाण जीवनीं असतां कल्पवरी । पाहातां अंतरीं कोरडा तो । कुचर मुग नये चि पाका । पाहातां सारिखा होता तैसा ॥२॥ तुका म्हणे असे उपाय सकळां । न चले या खळा प्रेत्न कांहीं । म्हणऊनि संग न करितां भला । धरितां अबोला सर्व हित ॥३॥