भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुष्ट दुराचारी । गोपाळाचा वेषधारी

dushta durachari | gopalacha veshadhari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दुष्ट दुराचारी । गोपाळाचा वेषधारी ॥१॥ दैत्य ओ-ळखिला । रामें प्रलंब मारिला ॥२॥ देव करिती जयजयकार । पुष्पें वर्षती अपार ॥३॥ सूर्य आलासे माध्यान्हा । देवा बाहाती भोजना ॥४॥ नामा ह्मणे पाचारती । गडी एकत्र बैसती ॥५॥