भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्बळांची कन्या समर्थाचे केलीं । अवदसा निमाली दरिद्राची

durbalanchi kanya samarthache kelin | avadasa nimali daridrachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुर्बळांची कन्या समर्थाचे केलीं । अवदसा निमाली दरिद्राची ॥१॥ हरिकृपा होतां भक्ता निघती दोंदें । नाचती स्वानंदें हरिरंगी ॥२॥ देव भक्त दोन्हीं एकरुप झाले । मुळीचें संचलें जैसे तैसे ॥३॥ पाजळली ज्योती कापुराची वाती । ओवाळितां आरती भेद नुरे ॥४॥ एका जनार्दनीं कल्पाचि मुराला । तोचि हरि झाला ब्रह्मारुप ॥५॥