भजनी मालिका

भजने

अवघ्यां पातकांची मी एक रासी । अवघा तूं होसी सर्वोत्तम ॥१॥ जैसा तैसा करणें लागे अंगीकार । माझा सर्व भार चालविणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अवघ्या भूतांचें केलें संतर्पण । अवघी च दान दिली भूमि ॥१॥ अवघा चि काळ दिनरात्रशुद्धी । साधियेली विधि पर्वकाळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अवघ्या वाटा झाल्या क्षीण कळीं न घडे साधन । उचित विधि विधान न कळे न घडे सर्वथा ॥१॥ भक्तीपंथ बहु सोपा पुण्य नागवेया पापा । येणें जाणें खेपा येणें चि एके खंडती॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अवघ्या विद्येचा करूनी अभ्यास । पावलों मी क्लेश देवराया ॥१॥ मुक्ताबाई योगें उतरलों भवसिंधु । तैशी दीनबंधु कृपा करी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अवघ्या संसाराचा कळस जाला । आमुलाची कैसा पोट आला ॥१॥ पाठीं बैसला तोचि पोटी । उघड्या दिठीं देखतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अवघ्याचि संपत्ती आलीया घरा । तुमचिया दातारा आगमनें ॥१॥ शीतळ झालों पावन झालों । तुमचिया लागलों चरणांसी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अवचट देह लाधला प्राणिया । भक्तिवीण वांयां गेला जाण ॥१॥ धिक्‍ त्याचें जिणें जन्मला कासया । जरी पंढरिराया विसरला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अवचट दैवयोगें नाम येत मुखा । त्रैलोक्याचा सखा प्राण होय ॥१॥ आवडी आदरें उच्चारी जो नाम । वैकुंठ निजधाम तया सुख ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अवचिता त्यांणीं देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥१॥ आला घेऊनियां यमुनेबाहेरी । पालवितो हरी गडियांसि ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

अवतरला श्रीराम परब्रह्मा पुतळा । सुहास्य मुख सुंदर कांसे पितांबर पिवळा ॥१॥ दशरथनंदन रामपाहतां वो मनी ध्यातां । देहबुद्धी हरपली डोळें भरी पहातां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अवतरले हरी नंदाचे मंदिरीं । जाणोनियां सुरीं तोषि-जेत ॥१॥ आतां गेली सर्व आमची चिंता । भूभार सर्वथा उतरील ॥२॥

रचनाकार: संत नामदेव