भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवचितचि हातीं ठेवा । दिला सेवा न करितां

avachitachi hatin theva | dila seva na karitan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवचितचि हातीं ठेवा । दिला सेवा न करितां ॥१॥ भाग्य फळलें जाली भेटी । नेघें तुटी यावरी ॥ध्रु.॥ दैन्य गेलें हरली चिंता । सदैव आतां यावरी ॥२॥ तुका म्हणे वांटा जाला । बोलोंबोला देवासीं ॥३॥