भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघ्यां पातकांची मी एक रासी । अवघा तूं होसी सर्वोत्तम

avaghyan patakanchi mi ek rasi | avagha tun hosi sarvottam

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघ्यां पातकांची मी एक रासी । अवघा तूं होसी सर्वोत्तम ॥१॥ जैसा तैसा करणें लागे अंगीकार । माझा सर्व भार चालविणें ॥ध्रु.॥ अवघें चि मज गिळियेलें काळें । अवघीं च बळें तुझे अंगीं ॥२॥ तुका म्हणे आतां खुंटला उपाय । अवघे चि पाय तुझे मज ॥३॥