भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघ्या भूतांचें केलें संतर्पण । अवघी च दान दिली भूमि

avaghya bhutanchen kelen santarpan | avaghi cha dan dili bhumi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघ्या भूतांचें केलें संतर्पण । अवघी च दान दिली भूमि ॥१॥ अवघा चि काळ दिनरात्रशुद्धी । साधियेली विधि पर्वकाळ ॥ध्रु.॥ अवघीं च तीर्थे व्रतें केले याग । अवघें चि सांग जालें कर्म ॥२॥ अवघें चि फळ आलें आम्हां हातां । अवघें चि अनंता समर्पीलें ॥३॥ तुका म्हणे आतां बोलों अबोलणें । कायावाचामनें उरलों नाहीं ॥४॥