भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघ्याचि संपत्ती आलीया घरा । तुमचिया दातारा आगमनें

avaghyachi sampatti aliya ghara | tumachiya datara agamanen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अवघ्याचि संपत्ती आलीया घरा । तुमचिया दातारा आगमनें ॥१॥ शीतळ झालों पावन झालों । तुमचिया लागलों चरणांसी ॥२॥ धरिलीया जन्माचें सार्थक झालें । तुम्हीं अवलोकिलें म्हणोनियां ॥३॥ निळा म्हणे धरिलें हातीं । जेव्हांचि संतीं तुम्हीं मज ॥४॥