भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु

avachita parimalu jhulakala alumalu

अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु । मी म्हणे गोपाळु आलागे माये । चांचरती चांचरती बाहेरी निघालें । ठकचि मी ठेलें काय करुं ॥१॥ मज करा कां उपचारु अधिक ताप भारु । सखिये सारंगधरु भेटवा कां ॥ध्रु०॥ तो सांवळा सुंदरु कासे पीतांबरु । लावण्य मनोहरु देखियेला ॥ भरलिया दृष्टि जंव डोळां न्याहाळी । तव कोठें वनमाळी गेलागे माये ॥२॥ बोधोनि ठेलें मन तंव जालें अने आन । सोकोनि घेतले प्राण माझेगे माये । बापरखुमादेविवरु विठ्ठल सुखाचा । तेणें कायामनेंवाचा वेधियेलें ॥३॥