भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघ्या सोडियेल्या मोटा

avaghya sodiyelya mota

रचनाकार: संत भानुदास · अभंग
अवघ्या सोडियेल्या मोटा । आजीचा दहिंकाला गोमट ॥१॥ घ्या रे घ्या रे दहींभात । आम्हां देतो पंढरीनाथ ॥२॥ मुदा घेऊनियां करीं । पेंद्या वांटितो शिदोरी ॥३॥ भानुदास गीतीं गात । प्रसाद देतो पंढरीनाथ ॥४॥