भजनी मालिका

भजने

अवघें ब्रम्हरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥१॥ नाहीं भाव तया सांगावें तें किती । आपुल्याला मतीं पाखांडिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अवघे सावधान होऊनि विचारा । सोडवण करा संसाराची ॥१॥ अवघा काळ वाचे ह्मणा नारायण वांयां एक क्षण जाऊं नेदी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अवघें हें पवित्र पांडुरंग क्षेत्र । सुखाचि सर्वत्र भरलें असे ॥१॥ अवघा हा विठठल गीतीं गातां । अवघें पुरवी कोड नामें एकें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अवघे हो ऐका अवघे श्रवणीं । अवघेचि होऊनि एकचित ॥१॥ विठोबाचें नाम अवघेंचि गोमटें । विचारीम नेटेंपाटें आपुल्या मनीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अवघें होऊनि कांहींचि नव्हे । आपुल्या स्वाभावें आपण ॥१॥ तया नांव आत्मतत्व । शुध्द सत्व मायादी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अवघेंचि त्रैलोक्य आनंदाचे आतां । चरणीं जगन्नाथा चित्त ठेलें ॥१॥ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथांचा नाथ जनार्दन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अवघेंची सुख तयासी जोडलें । अवघे पाउलें देखतांची ॥१॥ अवघें ब्रह्मारुप नाहीं कांहीं चिंता । अवघाचि देखतां पांडुरंग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अवघ्या अंगें अवघें झालों । अवघेचि ल्यालों आळंकार ॥१॥ अवघ्या ठायीं अवघ्या देहीं । अवघ्या नाहीं वेगळां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अवघ्या कळा याचे हातीं । न करी काय एक श्रीपती । विष पाजितां अमृतीं । केली तृप्ती प्रल्हादा ॥१॥ चंद्रहास्याचा कैवारी । रक्षिलें त्या महामारी । राज्य देऊनियां मुरारी । वैष्णवांमाजी श्रेष्ठ केला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अवघ्या जेष्ठादेवी । कोण पूजनाचा ठाव । धरितां चि भाव । कोठें नाहींसें झालें ॥१॥ दिसे सारिखें सारिखें । परि तें कारणीं पारिखें । तळीं गेलें देखें । वरी टोले न साहाती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अवघ्या दशा येणें साधती । मुख्य उपासना सगुणभक्ती। प्रगटे हृदयींची मूर्ती । भावशुद्धी जाणोनियां ॥१॥ बीज आणि फळ हरींचे नाम । सकळ पुण्य सकळ धर्म । सकळां काळांचें हे वर्म। निवारी श्रम सकळ ही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम