भजनी मालिका

भजने

जोहारियाचे पुढें मांडियेलें रत्न । आतां मोला उणें येईल कैसें ॥१॥ तैसें थापटणें पारखियाचा हात । वाफ जाल्या घात वायां जाती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ज्ञातिकुळ सांडिलें आम्हीं वेंगीं । माय माहेर त्याजिलें तुजलागीं । अंग अर्पिलें अंगीचिये अंगीं । शेखीं रतलासे दासी कुब्जेलागीं ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्ञान ध्यान जप तप तें साधन । तें हे संतनिधान सखे माझे ॥१॥ संतापायीं आधीं जावें वो शरण । संसार बोळवण होय तणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्ञान ध्यान जप तप साधन तें । नाम प्रत्ययातें न ये कोणा ॥१॥ गुरुपदीं जावें आधीं हो शरण । मी हें माझें ओळखुन घ्यावें नाम ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ज्ञान ध्यान वर्म शाब्दिक कवित्व । हे तो न कळे अर्थ मूढाप्रती ॥१॥ राम सुखें गावा राम सुखें गावा । वाचे आठवावा कृष्ण सदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्ञान वैराग्य कावडी खांदीं । शांति जीवन तयामधीं ॥१॥ शिवनाम तुम्हीं घ्या रे । शिवस्मरणीं तुम्हीं रहा रे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्ञान व्हावें आधीं ओळखावें नांवा । मग जावें गांवा तयाचिया ॥१॥ या नामाचें मूळ त्या माजीं जो धाला । प्रपंच्याचा घाला मग नाहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ज्ञान सत्य मुक्त शुद्ध बुद्ध युक्त । कारण रहित निरं-जन ॥१॥ तें आह्मीं देखिलें चर्मचक्षु दृष्टीं । उभा वाळवंटीं पंढ-रीये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ज्ञान होय आधीं संतां शरण जातां । मग वोळखितां कळे रुप ॥१॥ नामांचे जें मुळ रुपांचें रुपस । पंढरीनिवास हृदयीं धरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं । उतरील पैल पारूं ज्ञानदेव ॥१॥ ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता । तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥२॥

रचनाकार: संत सेना

ज्ञानदेव चतुरक्षरीं जप हा करितु सर्वज्ञा । ज्ञानाज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा । ज्ञाता ज्ञेय जागे होय ऐसी प्रतिज्ञा । ज्ञानाग्नीनें पापें जळती हें ज्याची आज्ञा ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्ञानदेव ज्ञानदेव वदतां वाचे । नाहीं कळिकाळाचें भेव जीवां ॥१॥ जातां अलंकापुर गांवीं । मोक्ष मुक्ति दावी वाट त्यासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्ञानदेव माझें सौख्यसरोवर । त्यांत जलचर स्वस्थ होतों ॥१॥ दुर्दैव तापानें आटलें तें नीर । वर्षी रघुवीर कृपामेघ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव