भजनी मालिका

भजने

ज्या ज्या भक्तीं जेथें जेथें । पाचारिलें ज्या ज्या आर्थे । तुम्ही जाउनियां तेथें । साह्य केलें श्रीहरी ॥१॥ आर्तें गजेद्राचें स्तवन । ऐकतांचि पदाभिगमन । करुनियां त्याची अर्ति हरण । निजधामाप्रती पाठविला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ज्या नामे पाषाण जळांत तरलें । नाम त्या रक्षिलें प्रल्हादासी ॥१॥ अग्नि विष बाधा नामेंचि निवारीं । गिरीं आणि कंदरें रक्षी नाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्या सुखा कारणें योगाभ्यास । शरीर दंड काय क्लेश । तें उभें आहे अपैस । भीमातीरीं वाळुवंटीं ॥१॥ न लगे दंडन मुंडनी आटी । योगायागाची कसवटी । मोकळी राहाटी । कुंथाकुंठी नाहीं येथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्या सुखाकारणें देव वेडावला । वैकुंठ सांडुनीं संतसदनीं राहिला ॥१॥ धन्य धन्य संतांचें सदन । जेथें लक्ष्मीसहित शोभे नारायण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्या सुखाकारणें योगी शिणताती । परी नव्हे प्राप्ती तयांलागी ॥१॥ तें प्रेमभावें पुंडलिका वोळलें । उघडेंचि आलें पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

ज्याकारनें योगें रिघती कपाटीं । तो उभा असे ताटीं चंद्रभागे ॥१॥ सांवए रुपडें गोजिरे गोमटें । धरिले दोन्ही विटे समचरण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्याचिया रे मनें देखियेलें तुज । त्याची लोकलाज मावळली ॥१॥ नाहीं तया क्रिया नाहीं तया कर्म । नाहीं वर्णाश्रम सुखदुःख ॥२॥

रचनाकार: संत नामदेव