भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञान ध्यान जप तप साधन तें । नाम प्रत्ययातें न ये कोणा

dnyan dhyan jap tap sadhan ten | nam pratyayaten na ye kona

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञान ध्यान जप तप साधन तें । नाम प्रत्ययातें न ये कोणा ॥१॥ गुरुपदीं जावें आधीं हो शरण । मी हें माझें ओळखुन घ्यावें नाम ॥२॥ तयाचें तें मूळ पाहोनियां त्यांते । मिळवावें द्वैत अद्वैतातें ॥३॥ द्वैत द्वतातीत स्वयंभ संचलें । तेंचि नाम आलें त्रिभुवनीं ॥४॥ नामदेव म्हणे परब्रह्म नाम । द्वैत क्रियाकर्म नाहीं तेथें ॥५॥