भजनी मालिका

भजने

जों जों धरसी वासना । तों तों नोहे रे उगाणा । पंढरीचा राणा । ध्यानामाजीं आणिक ॥१॥ हेंचि सर्व साधनांचें सार । नको व्युप्तत्तीचा भार । या वचनीं निर्धार । धरी संतपायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जो जो धरसील भाव । तें तें देईल देव । ये अर्थी संदेह । मानूं नको ॥१॥ भावें भक्ति फळे । भावें देह मिळे । निजभावें सोहळे । स्वानंदाचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जो न कळे वेदशास्त्र गे माये । तो गोकुळी चोरुनी लोणी खाये ॥१॥ ऐशी भाविकांची आवडी देखा । टाकुनी आला वैकुंठ सुखा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जो निर्गुण निराभास । जेथुन उद्भव शबल ब्रह्मास । आदिनारायण म्हणती ज्यास । तो सर्वांस आदिगुरु ॥१॥ तयाचा ब्रह्मा अनुग्रहीत । ब्रह्मा अत्रीस उपदेशीत । अत्रीपाद प्रसादीत । श्रीअवधुत दत्तात्रय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जो परात्पर परेपरता । आदि मध्य अंत नाहीं पाहतां । आगमानिगमां न कळे सर्वथा । तो पंढरीये उभा राहिला ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

जो परिपुर्ण परब्रह्मा व्यापक गे माये । तो गोकुळीं गाई चारिताहे ॥१॥ पहा हो भुलला भक्ति प्रेमासी । शिदोर्‍या चोरुनी खाये वेगेंसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जों विनटला श्रीहरिचरणीं । त्यासी भवबंधनीं श्रम नाहीं ॥१॥ देव उभा मागें पुढें । वारी सांकडें भवाचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जो हा उद्धार प्रसवे ॐ कार । तें रुप सुंदर विटेवरी ॥१॥ ध्याता ध्यान ध्येय जेथें पैं खुटलें । तें प्रगटलें पंढरीयें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जो हा दुर्लभ योगिया जनासी । उभाचि देखिला पुंडलीकापासी ॥१॥ हारपलें दुजेपण फिटला संदेह। निमाली वासना गेलादेहभाव ॥२॥

रचनाकार: संत सेना