भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानदेव पहावा डोळां । ऐसें वाटतें विठ्ठला

dnyanadev pahava dolan | aisen vataten viththala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञानदेव पहावा डोळां । ऐसें वाटतें विठ्ठला ॥१॥ जगजेठी जगत्पाळ । माझी पुरवावी आळ ॥२॥ तुम्हां काय अवघड । लीळें झेला गिरिगड ॥३॥ कल्पतरुतळीं वास । त्या घडे कां उपवास ॥४॥ माझ्या कृपाळुवा देवा । हांकेसरसा घेशी धांवा ॥५॥