भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानदेव उभा जोडोनि हस्त । पाहती समस्त

dnyanadev ubha jodoni hasta | pahati samasta

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञानदेव उभा जोडोनि हस्त । पाहती समस्त । विठोजी म्हणे सकळा स्वार्थ । या ज्ञानांजनाचा ॥१॥ कैसे वोळले त्वाम ज्ञाना । समाधान तया ध्याना । मन नाठवें मीतूंपणा । समाधि खूना ज्ञानासी ॥२॥ मग म्हणे विठोजी दातार । समाधि तुज निरंतर । आतां प्रस्थान करी साचार । मज निरंतर आठवी ॥३॥ कैसे परिपूर्ण वोळले । आपण समाधिरुप जाले । मनातें मन समरसलें । विठठलरुपीं ॥४॥ दशमी प्रस्थानाचा समयो । येकादशी जागर उत्सावो । द्वादशी क्षीरापती महोत्सवो । ज्ञानदेवेम केला ॥५॥ त्रयोदशीं म्हणे पांडुरंग । कांहीं न करीं गा उद्वेग । आळकापुरीं समाधि प्रसंग । करीं करीम लवलाह्या ॥६॥ माता रुक्मणी वाढी ताटीं । विठोजी म्हणे उघडी दृष्टी । तुज मज आहे नित्य भेटी । येई पंढरीये ॥७॥ नामा म्हणे ज्ञानउदयो । आळंकापुरीं सिद्ध समयो । परी विठठलीं मुराला भावो । या ज्ञानदेवाचा ॥८॥