भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञान ध्यान जप तप तें साधन । तें हे संतनिधान सखे माझे

dnyan dhyan jap tap ten sadhan | ten he santanidhan sakhe majhe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्ञान ध्यान जप तप तें साधन । तें हे संतनिधान सखे माझे ॥१॥ संतापायीं आधीं जावें वो शरण । संसार बोळवण होय तणें ॥२॥ तयाचे हें मुळ संतांचे पाय । आणीक उपाय नाही नाहीं ॥३॥ द्वैत अद्वैताचा न सरेचि कोंभ । तो हाचि स्वयंभ संतसंग ॥४॥ एका जनार्दनीं परब्रह्मा जाम । द्वैत क्रियाकर्म तेथे नाहीं ॥५॥