भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञान होय आधीं संतां शरण जातां । मग वोळखितां कळे रुप

dnyan hoy adhin santan sharan jatan | mag volakhitan kale rup

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्ञान होय आधीं संतां शरण जातां । मग वोळखितां कळे रुप ॥१॥ नामांचे जें मुळ रुपांचें रुपस । पंढरीनिवास हृदयीं धरी ॥२॥ प्रपंचीं परमाथीं तारक हें नाम । ब्रह्मानंद प्रेम सर्व वसे ॥३॥ सच्चिदानंद खूण एका जनार्दनीं । स्वयं ब्रह्म जाण नाम असे ॥४॥