भजनी मालिका

भजने

कोण पार नेई भवनदींतुनीं । सदगुरुवांचुनी तुम्हालांगीं ॥१॥ अनंत उपाय जरी तुम्हीं केले । पार पावविलें नव जाय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोण पुण्यें यांचा होईन सेवक । जींहीं द्वंदादिक दुराविलें ॥१॥ ऐसें वर्म मज दावीं नारायणा । अंतरीं च खुणा प्रकटोनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोण भाग्याचे ते लोक । केलें कौतुक तुम्हीं ज्यांचें ॥१॥ वागउनियां कडिये खांदीं । निजात्मपदीं स्थापियलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कोण माझा आतां करील परिहार । तुजवीण डोंगर उतरी कोण ॥१॥ तूं वो माझी माय तूं वो माझी माय । दाखवीं गे पाय झडकरी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

कोण मानील हा नामाचा विश्वास । कोण होईल उदास सर्वभावें ॥१॥ कलियुगामाजीं अभाविक जन । करती उच्छेदन भक्तिपंथा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोण या पुरुषार्थाची गति । आणियेला हातोहातीं । जाहाज पृथ्वीपति । केली ख्याती अद्भुत ॥१॥ भला रे पुंडलिका भला । महिमा नव जाये वर्णिला । दगा देउनि अवघियांला । सांटविलें अविनाश ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोण येतें घरा आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा ॥१॥ देवासाटीं जालें ब्रम्हांड सोइरें । कोमळ्या उत्तरें काय वेचे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोण सुख धरोनि संसारीं । राहों सांग मज बा हरी । अवघ्या नाशिवंता परी । थिता दुरी अंतरसी ॥१॥ प्रथम केला गर्भीवास । काय ते सांगावे सायास । दुःख भोगिलें नव ही मास । आलों जन्मास येथवरी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कोण हरी आतां संसाराचा छंद । न स्मरतां गोविंद दुःख बहु ॥१॥ शहाणे बुडती शहाणे बुडती । शहाणे बुडती भवडोहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोण होईल आतां संसारपांगिलें । आहे उगवलें सहजें चि ॥१॥ केला तो चालवीं आपुला प्रपंच । काय कोणां वेच आदा घे दे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोण होईल आत्मज्ञानी । जो बा राहे त्याच्या ध्यानीं ॥१॥ मज तो चरणांची आवडी । जन्मोजन्मीं मी न सोडी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कोणतें कारण राहिलें यामुळें । जें म्यां तुज बळें कष्टवावें ॥१॥ नाहीं जात जीव नाहीं होत हानी । सहज तें मनीं आठवलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम