भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणा चिंता आड । कोणा लोकलाज नाड

kona chinta ad | kona lokalaj nad

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोणा चिंता आड । कोणा लोकलाज नाड ॥१॥ कैंचा राम अमागिया । करी कटकट वांयां ॥ध्रु.॥ स्मरणाचा राग । क्रोधें विटाळलें अंग ॥२॥ तुका म्हणे जडा । काय चाले या दगडा ॥३॥