भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण येथें रिता गेला । जो जो आला या ठाया

kon yethen rita gela | jo jo ala ya thaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोण येथें रिता गेला । जो जो आला या ठाया ॥१॥ तातडी ते काय आतां । ज्याची चिंता तयासी ॥ध्रु.॥ नांवासाठी नेघें भार । न लगे फार वित्पत्ति ॥२॥ तुका म्हणे न लगे जावें । कोठें देवें सुचेना ॥३॥