भजनी मालिका

भजने

कोणे एके दिवशीं खेळत खेळत । गेला सभेआंत राजयाच्या ॥१॥ पाहिलें राजानें ओळखिला पुत्न । झळंबलें गात्र आवडीनें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कोणे गांवीं आहे सांगा हा विठ्ठल । जरी ठावा असेल तुम्हां कोणा ॥१॥ लागतसें पायां येतों लोटांगणीं । मात तरी कोणी सांगा याची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोणें तुझा सांग केला अंगीकार । निश्चिंत त्वां थोर मानियेली ॥१॥ कोणें ऐसा तुज उपदेश केला । नको या विठ्ठला शरण जाऊं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोण्या वियोगे गुंतला कवर्णे हातीं । परा पश्यंती मध्यमा जया धाती । श्रुति शास्त्र जया भांडती । तो कां हो रुसला श्रीपती ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

कोपटी तळपती गाई । हाडाचीं बेडी पडेल पायीं । तोंड चुकवितां इज्जत जाई । मग वाचोनियां । काय कीजे मायबाप ॥१॥ जोहार पाटील बाजी । चावडी चलाना कां जी । ऐसें सांगत आलों आजी । बहुत बाकीं थकली की मायबाप ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

कोरडिया ऐशा काय सारू गोष्टी । करा उठाउठीं हित आधीं ॥१॥ खोळंबला राहे आपुला मारग । पहावी ते मग तुटी कोठें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोरड्या गोष्टी चावट्या बोल । शिकल्या सांगे नाहीं ओल ॥१॥ कोण यांचें मना आणी । ऐकों कानीं नाइकोनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोल्हीं कय कोल्हीं होती जड । तैसें तुझें मज मिळालें असे वाड ॥१॥ आंधळें मुकें कानीं नायके । त्यासी काय जननी पोसूं न शके ॥२॥

रचनाकार: संत नामदेव