भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण मानील हा नामाचा विश्वास । कोण होईल उदास सर्वभावें

kon manil ha namacha vishvas | kon hoil udas sarvabhaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कोण मानील हा नामाचा विश्वास । कोण होईल उदास सर्वभावें ॥१॥ कलियुगामाजीं अभाविक जन । करती उच्छेदन भक्तिपंथा ॥२॥ नानापरीचीं मतें नसती दाविती । नानामंत्र जपती अविधीनें ॥३॥ एका जनार्दनीं पातकाची राशी । नाम अहर्निशीं न जपती ॥४॥