भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण होईल आतां संसारपांगिलें । आहे उगवलें सहजें चि

kon hoil atan sansarapangilen | ahe ugavalen sahajen chi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोण होईल आतां संसारपांगिलें । आहे उगवलें सहजें चि ॥१॥ केला तो चालवीं आपुला प्रपंच । काय कोणां वेच आदा घे दे ॥ध्रु.॥ सहजें चि घडे आतां मोळ्याविण । येथें काय सीण आणि लाभ ॥२॥ तुका म्हणे जालों सहज देखणा । ज्याच्या तेणें खुणा दाखविल्या ॥३॥