भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणा पुण्या फळ आलें । आजि देखिलीं पाउलें

kona punya phal alen | aji dekhilin paulen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोणा पुण्या फळ आलें । आजि देखिलीं पाउलें ॥१॥ ऐसें नेणें नारायणा । संतीं सांभाळिलें दीना ॥ध्रु.॥ कोण लाभकाळ। दीन आजि मंगळ ॥२॥ तुका म्हणे जाला । लाभ गा विठ्ठला ॥३॥