भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण हरी आतां संसाराचा छंद । न स्मरतां गोविंद दुःख बहु

kon hari atan sansaracha chhand | na smaratan govind duhkh bahu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कोण हरी आतां संसाराचा छंद । न स्मरतां गोविंद दुःख बहु ॥१॥ शहाणे बुडती शहाणे बुडती । शहाणे बुडती भवडोहीं ॥२॥ तत्त्वज्ञानाच्या सांगताती गोष्टी । परि संसार हिंपुटी होती मूढ ॥३॥ एका जनार्दनीं संसाराचा छंद । टाकुनी गोविंद भजे कां रे ॥४॥