भजनी मालिका

भजने

काय मागावें कवणासी । ज्यासी मागों तो मजपाशीं ॥१॥ जरी मागों पद इंद्राचें । तरी शाश्वत नाहीं त्याचें॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय माझा आतां पाहातोसी अंत । येईं बा धांवत देवराया ॥१॥ माझ्या जीवा होय तुजविण आकांत । येईं बा धांवत देवराया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय माझा पण होईल लटिका । ब्रिदावळी लोकां दाविली ते ॥१॥ खरी करूनियां देई माझी आळी । येऊनि कुरवाळी पांडुरंगे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय माझी संत पाहाती जाणीव । सर्व माझा भावत्यांचे पायीं ॥१॥ कारण सरतें करा पांडुरंगीं । भूषणाची जगीं काय चाड ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय माझें नेती वाईट म्हणोन । करूं समाधान कशासाठी ॥१॥ काय मज लोक नेतील परलोका । जातां कोणा एका निवारील ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय मी अन्यायी तें घाला पालवीं । आणीक वाट दावीं चालावया ॥१॥ माग पाहोनियां जातों ते च सोयी । न वजावें कायी कोणी सांगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण । ऐसें तुम्ही सांगा संतजन । करा समाधान चित्त माझें ॥१॥ काय हें खंडईल कर्म । पारुषतील धर्माधर्म । कासयानें तें कळे वर्म । म्हणउनी श्रम वाटतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय म्यां बोलावें किती माझी मति । तुम्ही रमापति गोड केलें ॥१॥ विश्वरूप घडी उघडिली धडफुडी । आतां काय थोडी कृपा म्हणूं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय म्यां मानावें हरीकथेचें फळ । तरिजे सकळ जनीं ऐसें ॥१॥ उच्छेद तो असे हा गे आरंभला । रोकडें विठ्ठला परचक्र ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय याचें बोलें तुज वाटतसे कोडे बोलते सांवळा अवघे वितंड ॥१॥ पुरें तुझें गाव नको आतां वस्ती । आम्हीं जाऊं सर्व मिळुनि मथुरेप्रती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काय याचे मुखीं बैसे दांतखीळ । नामोच्चारा बळ क्षीण होतें ॥१॥ काय याचे कर्ण बधिर पैं वहिले । हरिकीर्तनीं जाहले पांगुळ ते ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काय वहिनीनें दिधलें आम्हांसी । दाखवा वेगेसी कृष्ण म्हणे ॥१॥ सोडियेली तेव्हां मुष्टी तंदुळिका । रुक्मीणीनाइका पुढें ठेवी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ थोरींव सांडिली आपुली परिसें । नेणे सिवों कैसें लोखंडासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय वाणूं आतां पायाचा महिमा । जेथें झाली सीमा बोलायाची ॥१॥ विठोबाचे पाय आठवितां मनीं । गेलें हरपोनी भवभय ॥२॥

रचनाकार: संत नामदेव