भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय दिला ठेवा । आम्हां विठ्ठल चि व्हावा

kay dila theva | amhan viththal chi vhava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय दिला ठेवा । आम्हां विठ्ठल चि व्हावा ॥१॥ तुह्मी कळलेती उदार । साटीं परिसाची गार ॥ध्रु.॥ काय जीव देता तरी । वचना नये येका सरी ॥२॥ गोमांसासमान । तुका म्हणे आम्हां धन ॥३॥