भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय तो विवाद असो भेदाभेद । साधा परमानंद एका भावें

kay to vivad aso bhedabhed | sadha paramanand eka bhaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय तो विवाद असो भेदाभेद । साधा परमानंद एका भावें ॥१॥ निघोनि आयुष्य जातें हातोहात । विचारीं पां हित लवलाहीं ॥२॥ तुका म्हणे भावभक्ती हे कारण । नागवी भूषण दंभ तोचि ॥३॥