भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय तुमचिया सेवे न वेचते गांठोळी । मोहें टाळाटाळी करीतसां

kay tumachiya seve na vechate gantholi | mohen talatali karitasan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय तुमचिया सेवे न वेचते गांठोळी । मोहें टाळाटाळी करीतसां ॥१॥ चतुराच्या राया आहो पांडुरंगा । ऐसें तरी सांगा निवडूनि ॥ध्रु.॥ कोण तुम्हां सुख असे या कौतुकें । भोगितां अनेकें दुःखें आह्मी ॥२॥ तुका म्हणे काय झालासी निर्गुण । आम्हां येथें कोण सोडवील ॥३॥