भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय देवापाशीं उणें । हिंडे दारोदारीं सुनें

kay devapashin unen | hinde darodarin sunen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय देवापाशीं उणें । हिंडे दारोदारीं सुनें ॥१॥ करी अक्षरांची आटी । एके कवडी चे साटीं ॥ध्रु.॥ निंदी कोणां स्तवी । चिंतातुर सदा जीवीं ॥२॥ तुका म्हणे भांड । जलो जळो त्याचें तोंड ॥३॥