भजनी मालिका
← भजनांकडे परत

काम लागे कृषापाठीं । कोली स्मशानाची गांठी

kam lage krushapathin | koli smashanachi ganthi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काम लागे कृषापाठीं । कोली स्मशानाची गांठी ॥१॥ परम कामें भुलविला । कृष्ण स्मशानासी नेला ॥२॥ भुलविला मनीं । रुद्र पाहोनी मोहनी ॥३॥ कन्येचिये पाठीं । ब्रम्हा लागे हतवटी ॥४॥ काम पराशरालागीं । ज्ञानासी लाविली आगी ॥५॥ काम गेला शुकापाठीं । म्हणे जनी मारी काठी ॥६॥