भजनी मालिका
← भजनांकडे परत

कामधेनु गाई घालुनी बाहेरी । ताक घरोघरीं मागतसे

kamadhenu gai ghaluni baheri | tak gharogharin magatase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कामधेनु गाई घालुनी बाहेरी । ताक घरोघरीं मागतसे ॥१॥ कल्पतरु वृक्ष असे ज्याचे घरीं । तो कां दारोदारीं भीक मागे ॥२॥ ऋद्धि आणि सिद्धि विठोबाच्या दासी । तया ह्रषिकेशी शरण जावें ॥३॥ इंद्र आणि चंद्र विठोबाचे किंकर । देव सुरवर ध्याती ज्यातें ॥४॥ राव आणि रंक विठोबाचे मागते । ते कायरे तूंतें देती बापा ॥५॥ ऐसा कोण आहे सर्व पुरविता । एका भग वंता वांचोनियां ॥६॥ मुखीं नाम असें पुण्य ज्या पदरीं । कळींकाळावरी सत्ता त्याची ॥७॥ विठा म्हणे शरण जाय ह्रषिकेशी । मग निजसुखासी पावसील ॥८॥