भजनी मालिका
← भजनांकडे परत

काढले कुटाळ वासना बळ

kadhale kutal vasana bal

रचनाकार: संत सोपान · अभंग
काढले कुटाळ वासना बळ । सर्व हा गोपाळ भरियेला ॥१॥ गेला पै परते शरीर हे रिते । नाशिवंत भुते दुरी केली ॥२॥ स्थावर जंगम स्थावरिला राम । सर्व शाम निःसंदेह ॥३॥ सोपान विनटे परब्रह्म घोटे । प्रपंच सपाट निर्वटियेला ।।४।।