भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांडितांचि कोंडा न निघे तांदूळ । शेरा कैंचे फळ अमृताचें

kanditanchi konda na nighe tandul | shera kainche phal amrutachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कांडितांचि कोंडा न निघे तांदूळ । शेरा कैंचे फळ अमृताचें ॥१॥ कण्हेरीच्या मूळा सुगंध तो नाहीं । कसाबाची गाई जिणें कैचें ॥२॥ रुईदूध जरी येईल । भोजना । लेभियाच्या धना वेंच नाहीं ॥३॥ निर्फळ हें जिणें भक्ताविण मन । नामा म्हणे जाण नये कामा ॥४॥